WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, तब्बल ३१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुका हादरला !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घेतला असून तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच तालुका कोरोनाचे हॉसस्पॉट बनत असल्याचेही निदर्शनास येत आहे. आज तालुक्यात कोरोना रुग्णांचा स्फोट झाला असून तब्बल ३१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुका हादरला आहे. तर प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. कोरोनाने तालुक्यात उग्ररूप धारण केले असून आजच्या रुग्ण संख्येने तालुक्यातील आता पर्यंतच्या एका दिवसात आढळलेल्या रुग्णसंख्यांचे विक्रम मोडीत काढून एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळल्याचा नवीन विक्रम नोंदविला आहे. आज ३१ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४० झाली आहे तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९९ झाली आहे. आज आणखी सात रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण १३९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच आज आणखी एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींची संख्या दोन झाली आहे.

तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून तालुका कोरोनाचे हॉसस्पॉट बनत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरदिवशी मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा चांगलाच फुगत चालला आहे. आज ६० तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी २६ पॉझिटिव्ह तर ३४ व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज १५ जणांचे रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आले असून ५ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी २५ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने २४७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. आज ३१ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन चांगलेच हादरले आहे. अनलॉकची परिस्थिती कोरोनाचे संक्रमण वाढविण्यास पूरक ठरत आल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासनाला उपाययोजना करतांना लक्षणीय अडथळे निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवायला गेले तर दुसरीकडे उसवत असल्याने प्रशासनही हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४० झाली असून १३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९९ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५५ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये उपचार घेत असून ३४ रुग्णांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच १० रुग्णांवर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या स्थितीत ७६ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. आज आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींची संख्या दोन झाली आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये कोलारपिंपरी येथील एक, नायगाव एक, रवीनगर एक, पोलीस क्वाटर एक, विठ्ठलवाडी एक, भालर येथील तेरा व्यक्ती, कैलास नगर तीन, मंदर एक, मुरधोंनी एक, पळसोनी एक, निळापूर एक, राजूर एक, गोकुलनगर एक, रंगारीपुरा एक, बेलदारपुरा एक, आयडीबीआय बँक एक, गणेशपूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. कोरोनाने बँकेतही प्रवेश केला असून विठ्ठलवाडीतील पीठ गिरणी व्यवसायी पॉझिटिव्ह आला आहे तर रेडिमेट ड्रेसेस मध्ये काम करणारा मंदर येथील व्युवक पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाने ग्रामीण भागात जाळं विणलं असून ग्रामीण भागातील रुग्णांची संख्याही चांगलीच वाढत आहे. शहरातील डॉक्टरांना कोरोनाची चांगलीच लागण होतांना दिसत असून नागिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होतांना दिसत आहे. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यानंतही नागरिक कित्येक दिवस खाजगीत उपचार करतांना दिसत असून लक्षणे तीव्र झाल्यानंतर कोविड केयर सेंटरमध्ये जातांना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कामुळे अन्य लोकांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी लक्षणे आढळल्यास स्वतःहून टेस्ट करण्याकरिता समोर येण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share