तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच, आज आणखी १४ व्यक्तींचे अहवाल आले पॉझिटिव्ह !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात सातत्याने कोरोना बाधित रुग्ण आढळत असून तालुका कोरोनाचे हॉस्स्पोट बनतांना दिसत आहे. नागरिक कोरोना या आजाराला अगदी सहजतेने घेत असून प्रतिबंधित क्षेत्राला औपचारिकता समजून बिनधास्त प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पडत आहे. नागरिकांच्या या लापर्वाहिजणक वागण्याने कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तालुक्यात आज १४ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८३ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७९ झाली आहे. आज आणखी २२ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत २०१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दरदिवशी मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह आढळत असून कोरोना बाधितांचा आकडा फुगत चालला आहे. आज १९ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ५ पॉझिटिव्ह तर १३ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ४४ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून ९ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ३५ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत १३४५ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून १८७४ व्यक्तींच्या स्वाबची तपासणी करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३४ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून ३१ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १४ रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरु आहेत. आज आणखी ३६ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता कोरोना लॅब मध्ये पाठविण्यात आले असून २६७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहे. सध्यास्थितीत ७६ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. आज १४ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८३ झाली असून २०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७९ वर आली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये भोईपुर येथील एक, टागोरचौक एक, साधनकरवाडी एक, कॉटन मार्केट एक, विठ्ठलवाडी येथील एक, भांडेवाडा एक, विराणी टॉकीज जवळील एक, जिल्हापरिषद कॉलनी एक, गुरुनगर दोन, सोमनाळा एक, सेवानगर एक, एक देशमुखवाडी येथील एक तर न्यायालयातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाने आता न्यायालयातही प्रवेश केला असून न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल नांदेपेरा रोडवरील दवाखाना असलेल्या डॉक्टर दाम्पत्याकडे सेवेत असणारी परिचारिका व घरकाम करणारी महिला पॉझिटिव्ह आल्याचे कळते. विठ्ठलवाडीतही रुंगांची संख्या वाढीस लागली असून आता पर्यंत आठ व्यक्ती याठिकाणी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत असून नागरिकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करून स्वतःचे व इतरांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.