तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, आज ३६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुका हादरला !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच असून तालुक्यात कोरोना संक्रमणाची गती अगदीच तीव्र झाली आहे. आज कोरोना संक्रमित व्यक्तींच्या संख्येने उचांक गाठला असून एका दिवसात ३६ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. तालुका कोरोनाचा हॉसस्पॉट बनला असून सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनही हादरले आहे. आरोग्य विभागही सततच्या रुग्णवाढीने मेटाकुटीस आल्याचे पाहायला मिळत आहे. आशासेविकांची व आरग्य सेवकांची चांगलीच पायपीट होत असून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची नोंदणी व तपासणी करतांना त्यांची दमछाक होतांना दिसत आहे. आज ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१९ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१ झाली आहे. शहरातील आणखी एका कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींची संख्या चार झाली आहे. आज आणखी २३ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण २२४ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे.
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या उचांक गाठत आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णसंख्येने एका दिवसातील पॉझिटिव्ह रुग्णांचा विक्रम मोडला असून एका दिवसातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा नवीन विक्रम आज प्रस्थापित केला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आज ३६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुका हादरला आहे. कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात ठेवण्याचे सर्व प्रयत्न असफल होतांना दिसत आहे. नागरिकांच्या बेजाबदारपने कळस गाठला असून त्यांची लापर्वाही कोरोना संक्रमणाचे कारण बनत आहे. आज ५८ नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले असून २२ पॉझिटिव्ह तर ३६ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ७४ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी १४ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ६० व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत १४१९ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली असून १८९९ व्यक्तींच्या स्वाबची तपासणी करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४७ व्यक्ती कोविड केयर सेंटरमध्ये भरती असून ३० व्यक्तींना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १४ व्यक्तींवर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज एकूण ३६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३१९ झाली असून २२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१ झाली आहे. पांढरकवडा येथे कोरोनाचा उपचार घेत असलेल्या ६५ वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींची संख्या चार झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये साईनगरी येथील दोन, गुरुवर्य कॉलनी एक, सिंधी कॉलनी एक, शिवाजी चौक पाच, चिखलगांव एक, जैन ले-आऊट एक, कणकवाडी एक, भीमनगर एक, नांदेपेरा रोड एक, श्रीराम नगर एक, रंगारीपुरा चार, सेवानगर दोन, छोरीया नगर एक, जिल्हा परिषद कॉलनी एक, ग्रामीण रुग्णालय क्वाटर एक, न्यायालयातील दोन, पटवारी कॉलनी एक तर सानेगुरुजी नगर येथील सहा व्यक्तींचा समावेश आहे. आज आणखी एका नामांकित डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला आहे. न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाचे संक्रमण वाढत असून आज आणखी दोन कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले आहेत. शहरात कोरोनाचा तांडव सुरु असून डॉक्टरच पॉझिटिव्ह निघत असल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होतांना दिसत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.