WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच असून आज १५ व्यक्तिंचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच असून सतत पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा फुगतच चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने प्रशासनही चिंताग्रस्त झालं असून आरोग्य प्रशासनावरही चांगलाच तान निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना संक्रमणाची गती अधिकच तीव्र झाली असून तालुक्यात कोरोनाच संकट गडद होतांना दिसत आहे. आज आणखी १५ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३८ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७५ झाली आहे. आज आणखी १६ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत २५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून कोरोना बाधितांची संख्या जलद गतीने वाढत आहे. ११ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या ३१ दिवसांच्या कालावधीत २९७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. ११ ऑगस्टला एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४१ होती. तर आज हा आकडा ३३८ वर पोहचला आहे. कोरोनाचा संसर्ग अगदीच जलद गतीने वाढत असल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होते आहे. आज ३३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ७ पॉझिटिव्ह तर २७ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज २६ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून ८ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १८ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत १४६९ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून १९५१ व्यक्तींच्या स्वाबची (आरटी पीसीआर) तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी २४ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने २३५ स्वाबचे अहवाल येणे बाकी आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २८ रुग्णांवर कोविड केयर सेंटरमध्ये उपचार सुरु असून ३३ व्यक्तींना होम आयसोलेशनची मुभा देण्यात आली आहे. तर १४ व्यक्ती यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. आज १५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३३८ झाली असून २५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७५ झाली आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्या करिता वेगवेळ्या उपाययोजना करीत असून आरोग्य प्रशासनही रुग्णसेवेत तत्पर असल्याने कोरोनातून बऱ्यापैकी रुग्ण बरे होतांना दिसत आहे. शहरात आणखी एक सुसज्य कोविड केयर सेंटर तयार करण्याची योजना सुरु असून लवकरच रुग्णांच्या सेवेत ते उपलब्ध होणार असल्याचे कळते. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये गाडलीपुरा येथील दोन, गुरुवर्य कॉलनी दोन, भगतसिंग चौक एक, रंगारीपुरा दोन, सानेगुरुजी चौक एक, सेवानगर एक, टिळकनगर एक तर जुने कॉटन मार्केट येथील दोन व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना अतिरिक्त कोविड केयर सेंटर अगदी सुलभ व सोयीचे होणार आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share