तालुक्यात कोरोनाचा धमाका, आज ३९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने झाले रेकार्ड ब्रेक !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचे अहवाल मिळण्यास होणार विलंब व परिक्षेत्राबाहेर नागरिकांचा मुक्त वावर कोरोनाचे संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. आज कोरोना रुग्णांनी आणखी उचांक गाठला असून एका दिवसात ३९ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रेकार्ड ब्रेक झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३७७ आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९८ झाली आहे. आज आणखी १५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत २७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाची लाट पसरली असून कोरोनाच संकट अधिकच गडद होतांना दिसत आहे. नागरिक कोरोनाला अगदी सहजतेने घेत असून चोरून लपून प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पडून इतरांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. कोरोना अहवाल प्राप्त होण्याला बराच विलंब होत असल्याने दरम्यानच्या काळात नागरिक समाजात बिनधास्त वावरतांना दिसत आहे. स्वाब घेतलेले व्यक्तीही लोकांमध्ये वावरत असल्याने त्यातील काही व्यक्ती नंतर पॉझिटिव्ह आल्यास इतर नागरिकांचा जीव भांड्यात पडतांना दिसत आहे. चाचणी अहवाल येईस्तोर होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना असतांनाही काही व्यक्ती लापर्वहीचा कळस गाठून बाहेर पडतांना दिसत आहे. त्यांच्या समाजात वावरण्याने इतरांचे आरोग्य धोक्यात येत असून संक्रमणाची गती वाढत आहे. आज १०२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ३१ पॉझिटिव्ह तर ७१ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज २५ व्यक्तींची अँटीजेन चाचणी करण्यात त्यापैकी ८ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १७ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी २५ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १५८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३१ रुग्णांवर कोविड केयर सेंटरमध्ये उपचार सुरु असून ५३ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १४ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. आज शहरातील एका प्रसिद्ध वकिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींचा आकडा पाचवर गेला आहे. आज ३९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुका हादरला आहे. दिवसागणिक मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनावरील ताणही वाढतच आहे. आजच्या ३९ पॉझिटिव्ह रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३७७ झाली असून २७० रुग्ण कोरोनमुक्त झाले तर ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९८ झाली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये विठ्ठलवाडी येथील १०, कैलास नगर ३, चिखलगांव ३, गणेशपूर ३, काळे ले-आऊट १, लक्ष्मीनगर ३, गौरकार ले-आऊट १, पेटूर १, झोला १, भालर १, पळसोनी २, नायगाव १, अर्जुनी १, एकता नगर १. नवीन वागदरा १, साधनकरवाडी १, ओमनगर १, सदाशिव नगर १, गौरव कॉलनी १, माळीपुरा १ तर देशमुखवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. आज शहरातील २२ तर ग्रामीण भागातील १७ असे एकूण ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात आज आढळलेल्या कोरोना रुग्णांनी एका दिवसातील सर्वोच रुग्णसंख्येचे सर्वच रेकार्ड मोडीत काढले असून नवीन रेकार्ड निर्माण आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत असून नागरिकांनी स्वतःचे व इतरांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची दक्षता घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.