WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात कोरोनाचा ब्लास्ट, तब्बल ४१ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने तालुका हादरला !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरु असून कोरोनाची रुग्णसंख्या उचांकाचे शिखर गाठतांना दिसत आहे. आज रुग्ण संख्येने एका दिवसातील उचांक गाठला असून तालुक्यात आज तब्बल ४१ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनही हादरले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१८ झाली आहे तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२२ झाली आहे. आज आणखी १५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण २८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यातील आणखी दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींचा आकडा सातवर पोहचला आहे.

तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रुग्ण संख्या उचांक गाठत आहे. आजच्या रुग्णसंख्येने एका दिवसातील रुग्णसंख्येचा उचांक गाठला आहे. आज ५६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३६ पॉझिटिव्ह तर २० नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तसेच आज १४ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्हआले आहेत. आज आणखी २१ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आले आहे. त्यामुळे १५८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४४ रुग्ण कोविड केयर सेंटरला उपचार घेत असून ६२ व्यक्तींना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १६ व्यक्तींवर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज एकूण ४१ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुका हादरला आहे. तर प्रशासन चांगलेच चिंतेत आले आहे. आज नव्या उचांकासह ४१ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१८ एवढी फुगली आहे. २८५ रुग्ण कोरोनमुक्त झाले तर ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२२ झाली आहे. आज आणखी दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गणेशपूर येथील ५२ वर्षीय पुरुष व एका ८५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींची संख्या सात झाली आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये राजूर येथील सात, रांगणा सात, भालर चार, पळसोनी १, मुरधोंनी १, चिखलगाव १, पंचशीलनगर ६, वसंत विहार ३, विराणी टॉकीज परिसर १, पद्मावती नागरी १, देशमुखवाडी १, प्रगती नगर १, माळीपुरा १, सिंधी कॉलनी २, जैन ले-आऊट २, जिजामाता नगर १ तर इतर एका व्यक्तीचा समावेश आहे. वाढत्या कोरोना रुग्णांनी प्रशासन चिंतेत आले आहे तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासन हर संभव प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share