WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मद्याच्या नशेत दोन मित्रांमध्ये झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

मद्यसेवन केल्यानंतर दोन मित्रांमध्ये वादावादी होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने एका मित्राने दुसऱ्या मित्राला जबर मारहाण केल्याची घटना काल रात्री ७.३० वाजताच्या सुमारास दीपक चौपाटीवरील एका बारच्या समोर घडली. आज सकाळी कुटुंबीय त्याला दवाख्यात नेण्याच्या बेतात असतांना अचानक तो भोवळ येऊन खाली कोसळला व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रामपूर येथील मृतकाचे घर गाठून घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. तसेच खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याचे समजते. प्रफुल बंडू गारोडे (२८) रा. रामपुरा असे मृतकाचे नाव असून अमोल शंकर काकडे (३६) रा. शास्त्री नगर असे आरोपीचे नाव आहे. हे दोघेही अगदी जवळचे मित्र असून ते नेहमी सोबतच मद्य सेवन करीत असल्याचे समजते.

शहरातील रामपुरा परिसरातील रहिवासी असलेल्या व बारमध्ये काम करीत असलेल्या प्रफुल गारोडे याची शास्त्री नगर येथील रहिवासी असलेल्या अमोल काकडे याच्याशी घनिष्ट मैत्री होती. नेहमी प्रमाणे मद्याचे सेवन केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्याचे पर्यवसान वादावादीत होऊन वाद विकोपाला गेल्याने नंतर दीपक चौपाटी येथील बारच्या बाहेर त्यांच्या मध्ये जबर हाणामारी झाली. अमोलने प्रफुल याला लाकडी दंडुक्याने जबर मारहाण केल्याचे समजते. प्रफुल नशेत असल्याने रात्रीला त्याला वेदनांची जाणीव न झाल्याने तो तसाच घरी जाऊन झोपला. त्यानंतर सकाळी वेदना जाणवू लागल्याने कुटुंबीय दवाखान्यात नेण्याच्या तयारीत असतांना अचानक तो भोवळ येऊन खाली कोसळला व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. याबाबत पोलीस स्टेशला तक्रार देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठवून आरोपी अमोल शंकर काकडे याला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share