उकणी येथील २४ वर्षीय तरुणाने पाटाळा पुलावरून घेतली वर्धा नदीत उडी !

प्रशांत चंदनखेडे वणी :-
उकनी येथील रहिवाशी असलेल्या एका २४ वर्षीय तरुणाने पाटाळा येथील वर्धा नदीच्या पुलावरून उडी घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ईश्वर शिवशंकर शुक्ला (२४) रा. उकनी असे या उडी घेतलेल्या तरुणाचे नाव असून दुचाकी नदीच्या पुलावर उभी करून त्याने रात्री ७ वाजताच्या सुमारास नदीत उडी घेतल्याचे समजते. घुग्गुस येथील वेकोली अधिकाऱ्याने अशाच प्रकारे वर्धा नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच आज त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत असून सततच्या आत्महत्यांनी समाजमन हेलावल्याचे पाहायला मिळत आहे. ईश्वर शुक्ला याचा अजूनही थांगपत्ता लागला नसून प्रशासना तर्फे त्याचा शोध घेण्यात येत आहे.
तालुक्यातील उकानी येथील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय ईश्वर शुक्ता याने आज रात्री ७ वाजताच्या सुमारास आपली दुचाकी क्रं. MH २९ BN ९४१९ पुलावर उभी करून नदीत उडी घेतल्याचे समजते. ईश्वर शुक्ला हा नेहमी मद्य सेवन करीत असल्याचे समजते. त्याचे वडील १० वर्षाआधीच मरण पावले असून आई भालर कॉलरी येथे भांडी घासण्याचे काम करीत असल्याचे समजते. त्याला एक मोठी बहीण असून तिचे लग्न झाल्याचे समजते. ईश्वर हा पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनीत टायर हेल्पर म्हणून कमला होता. घरोघरची भांडी घासून मुलाला लाहण्याचे मोठे केले व आज त्याच पोटच्या गोळ्याने नदीत उडी घेतल्याने आईचा आधारच हिरावला असून तिच्या मनातील वेदना किंचाळ्याच्या रूपाने बाहेर पडत आहे. सायंकाळी ४.३० ते ५ वाजे पर्यंत गावातच असलेल्या ईश्वरने नदीच्या पुलावरून उडी घेतलीच कशी, हा एकच प्रश्न गाववासीयांना पडला आहे. काल १६ सप्टेंबरला त्याने २४ तासाची ड्युटी केली व आज अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचल्याने उकनी गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. ७ सप्टेंबर रोजी उकनी येथीलच व्हाल्वो कंपनीत ड्रायवर असलेल्या आकाश दर्वेकर या २८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आज ट्रान्सपोर्ट कंपनीतच टायर हेल्पर म्हणून कार्यरत असलेल्या २४ वर्षीय तरुणाने नदीत उडी घेतल्याने उकणी हे छोटेसे गांव हादरले आहे.