WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चोरीच्या दुचाकीसह चोरट्याला केली पोलिसांनी अटक

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून चोरटे पाळत ठेऊन घर, कार्यालय, दुकान व इतर महत्वपूर्ण कामाच्या ठिकाणी उभ्या केलेल्या दुचाक्या लंपास करतांना दिसत आहे. अशाच आणखी एका दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावून दुचाकी चोरट्याला अटक केली आहे.

गणेशपूर येथील सुरेश देवराव बल्की (३८) यांनी छोरीया ले-आऊट येथून २ सप्टेंबरला दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार ११ सप्टेंबरला पोलीस स्टेशनला नोंदविली. छोरीया ले-आऊट येथे उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची तक्रार प्राप्त होताच डीबी पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत गुप्त हेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे १८ सप्टेंबरला मोक्षधामच्या मागील बाजूस असलेल्या घोन्सा चौफुली रोड येथे उभा असलेल्या दुचाकी चोरट्याला डीबी पथकाने अटक करून त्याच्याकडून MH २९ BA ५८४२ क्रमांकाची स्प्लेंडर प्लस किंमत अंदाजे ३५ हजार रुपये, ही दुचाकी जप्त केली व आरोपी सौरभ घनश्याम भटवलकर (२१) रा. सेवानगर याला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदर कार्यवाही एसडीपीओ सुशीलकुमार नायक व पो.नि. वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर यांनी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share