WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महिला बचतगट कार्यालयातील चोरी प्रकरणी तीन आरोपींना अटक

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील शिक्षण प्रसारक मंडळ हायस्कुल जवळ असलेल्या महिला बचतगट कार्यालयीतील इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरी प्रकरणाचा पोलिसांनी अतिशीघ्र छडा लावून तीन आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. शहर व तालुक्यातील कित्येक चोरी प्रकरनाचा अतिशीघ्र छडा लावून डीबी पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

एस पी एम हायस्कुल जवळ असलेल्या महिला बचतगट कार्यालयातून १२ सप्टेंबरला दुपारी १२ वाजताच्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक साहित्य व पंखा चोरीला गेल्याची तक्रार महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळचे व्यवसाय समन्वयक रवींद्र चंद्रभान आत्राम (३०) यांनी १८ सप्टेंबरला पोलीस स्टेशनला नोंदविली. तक्रार प्राप्त होताच डीबी पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत गुप्त हेरांकडून माहिती मिळवत अगदी जलद गतीने या प्रकरणाचा छडा लावून तीन आरोपीना अटक केली. महेश संजय नेरकुंटलावार (१९) रा. दामले फैल, हरीश उर्फ टिक्का संजय रायपुरे (१९) रा. दामले फैल व संकेत संगम खोब्रागडे (२०) रा. भीमनगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नवे असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ४६१, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कडून बूस्टर कंपनीचे दोन साऊंड बॉक्स, बूस्टर कंपनीचा एक माईक असा एकूण १९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.

सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल फटिंग, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, डीबी पथकाचे सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम यांनी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share