तालुक्यात आज तीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून कधी तीव्र गतीने तर कधी संत गतीने रुग्णांची वाढ होतांना दिसत आहे. शहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने कोरोना बाधितांचा आकडाही फुगत चालला आहे. आज तीन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५४२ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०८ झाली आहे. आज आणखी २८ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण ४१५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तालुक्यात कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढतच असून आज जैन ले-आऊट येथील ५८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १५ वर पोहचला आहे.
तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढतच असून संक्रमित रुग्णांची संख्याही वाढतांना दिसत आहे. कधी कमी तर कधी अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. आज जिल्ह्याचे अहवाल प्राप्त झाले नसून रॅपिड अँटीजेन चाचणी द्वारे तीन रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. १७ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यापैकी ३ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १४ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत १६३२ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून २१९७ व्यक्तींच्या स्वाबची आरटी पीसीआर तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी २१ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ७८ स्वाबचे रिपोर्ट पेंडिंग झाले आहेत. आज तीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५४२ झाली असून ४१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०८ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १९ रुग्ण कोविड केयर सेंटरला उपचार घेत असून ७० रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. तर १९ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. आज आणखी शहरातील जैन ले-आऊट येथील कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १५ वर पोहचला आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमध्ये बोरगांव येथील एक, भालर येथील एक तर सुंदर नगर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. आज कमी प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून तीनही पॉझिटिव्ह रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. प्रशासन कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही कोरोनाच्या या लढाईत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.