WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरात कोरोनाचा कहर सुरूच, आज आढळले १२ पॉझिटिव्ह रुग्ण !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडतांना दिसत आहे. कोरोनाचे संक्रमण वाढतच असल्याने आरोग्य प्रशासनावरील ताणही वाढतांना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने नागरिकही भीतीच्या सावटात आले आहेत. आज आणखी १२ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५६४ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६ झाली आहे. आज आणखी १५ कोरोनाग्रस्त रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ४४९ कोरोनाग्रस्त रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आलेख वाढतच असून कोरोनाची परिस्थिती गंभीर होतांना दिसत आहे. सातत्याने कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा फुगत चालला आहे. ३० जूलै पर्यंत ३६ असलेला पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ५३ दिवसांत ५६४ वर पोहचला आहे. मागील ५३ दिवसांत तब्बल ५२८ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. एक वेळ कोरोनामुक्तीच्या वाटेवर आलेला वणी तालुका मागील ५३ दिवसांत कोरोना संक्रमणाचे हॉसस्पॉट बनला आहे. आज ३५ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ११ पॉझिटिव्ह तर २४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज १४ रॅपिड अँटीजेन टेस्टचे रिपोर्ट प्राप्त झाले असून एक व्यक्ती पॉझिटिव्ह तर १३ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आल्या आहेत. आज आणखी २३ व्यक्तींचे स्वाब आरटी पीसीआर तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ६६ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. तालुक्यात आज १२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५६४ झाली असून ४४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २७ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून १९ रुग्णांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर ५० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहे. सध्यस्थितीत ५४ व्यक्ती संस्थात्मक विलीगीकरणात आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये रजानगर येथील एक, ओमनगर दोन, सदाशिवनगर दोन, एकता नगर येथील चार तर महाराष्ट्र बॅंकेजवळील तीन व्यक्तींचा समावेश आहे. शहरात कोरोनाचा कहर सुरूच असून आज एकंदरीत १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरिता प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share