WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, आज ३१ व्यक्तींचे अहवाल आले पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ६०० पार !

Image

*प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)*

शहर व तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच असून तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचे संक्रमण वाढतच असून शहरात सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वच कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला कोरोनाने आपल्या कवेत घेतल्याचे पाहायला मिळत आहे. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांना नागपूर येथील सेव्हन स्टार हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. उद्याला त्यांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतांनाच आज आमदार कोरोनाग्रस्त झाल्याचे कळल्याने कार्यकर्ते चिंताग्रस्त झाले आहेत. वाढदिवसाच्या आनंदावर विरजण पडले असून कार्यकर्ते अनुत्साहित झाले आहेत. आज ३१ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६०८ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११६ झाली आहे. आज आणखी १२ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ४७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

तलुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच असून तालुक्यात कोरोना उग्ररूप धारण करतांना दिसत आहे. आज परत एकदा मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासना बरोबरच नागरिकही हादरले आहेत. कधी संत तर कधी तीव्र गतीने रुग्ण संख्येचा आलेख वाढतच चालला आहे. आज ४१ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून १२ पॉझिटिव्ह तर २९ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ७९ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून १९ पॉझिटिव्ह तर ६० व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत १७४४ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या तर २३०६ आरटी पीसीआर स्वाबच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. आज आणखी ३० व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ५० रिपोर्ट पेंडिंग झाले आहेत. तालुक्यात आज ३१ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६०८ झाली असून ४७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११६ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३० रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून २० रुग्णांवर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर ६६ रुग्णांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये चिखलगांव येथील दोन, कुंभारखणी नऊ, राजूर दोन, बेलोरा एक, काळे ले-आऊट तीन, जैन ले-आऊट एक, इंदिरा गांधी चौक दोन, जनता हायस्कुल जवळील एक, गोकुल नगर एक, शिंदोला तीन, येणक दोन, सुंदरनगर एक, विठ्ठलवाडी एक, विराणी टॉकीज जवळील एक तर शास्त्री नगर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. विठ्ठलवाडी येथील रुग्णसंख्येत भर पडत असून याठिकाणी आता पर्यंत २४ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरिता प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share