WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुकावासीयांकरिता दिलासादायक बाब, तालुक्यात आढळले आज दोनच कोरोनाग्रस्त रुग्ण !

Image

*प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)* तालुक्यात आज कोरोनाचे दोनच रुग्ण आढळल्याने तालुका वासियांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. तीव्र गतीने होणारे कोरोनाचे संक्रमण व दररोज मोठ्या संख्येने आढळणारे कोरोना बाधित रुग्ण यामुळे दहशतीत आलेल्या शहरविसीयांना आज दोनच कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने दिलासा मिळाला आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या दोन रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६१० झाली आहे तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०७ झाली आहे. आज आणखी ११ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण ४८४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

शहर व तालुक्यात दहशत माजविणाऱ्या कोरोनाने आज संयम बाळगला असून दोनच रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. आज ८ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून एक पॉझिटिव्ह तर ७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ३७ रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून एक व्यक्ती पॉझिटिव्ह तर ३६ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी २६ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ६८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. तालुक्यात आज दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१० झाली असून ४८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०७ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २९ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून २२ रुग्णांवर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर ५६ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये शास्त्रीनगर येथील एक तर राजूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधगिरी बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share