WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीवरच, तालुक्यात आज ११ व्यक्तींचे अहवाल आले पॉझिटिव्ह !

Image

*प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)*

तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच असून शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रभाव चांगलाच वाढतांना दिसत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला असून तालुक्यातील प्रत्येकचं गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव होतांना दिसत आहे. आज कोरोनाने वांजरी गावात प्रवेश केला असून याठिकाणी कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. आज ११ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६२१ झाली असून ऍक्टिव्ह पिझिटिव्ह रुग्णांची संख्या ११० झाली आहे. आज आणखी ८ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ४९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढत असून ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्तांची संख्याही वाढतांना दिसत आहे. आज ३३ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ७ पॉझिटिव्ह तर २६ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ३३ रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून ४ पॉझिटिव्ह तर २९ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी २७ नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ६२ नमुन्यांचे अहवाल पेंडिंग झाले आहेत. तालुक्यात आज ११ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६२१ झाली असून ४९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११० झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २९ रुग्ण कोरोना केयर सेंटरला भरती असून २२ रुग्णांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. तर ५९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. शहरात लवकरच खाजगी कोविड हॉस्पिटल सुरु होणार असून स्थानिकांनी काही अटी शर्थीवर कोविड हॉस्पिटल विरोधात सुरु असलेले उपोषण मागे घेतल्याने कोविड हॉस्पिटल सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहर प्रशासन व पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून नागरिकांची मनधरणी केल्याने व त्यांना परिसरात कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याची ग्वाही दिल्याने नागरिकांनी अखेर तीन दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मागे घेत कोविड हॉस्पिटल सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे नागरिकांना सर्वसुविधांनिशी सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल उपचाकरीता उपलब्ध होणार आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये सेवानगर येथील ३, कुंभारखणी ४, भालर २, वांजरी येथील एक तर विनायक नगर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share