कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीवरच, तालुक्यातील आज १४ व्यक्तींचे अहवाल आले पॉझिटिव्ह !

*प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)*
शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्येचा आलेख वाढतच आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा घट्ट होतांना दिसत असून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने एकीकडे प्रशासनावर तान पडत आहे, तर दुसरीकडे नागरिक भीतीयुक्त वातावरणात वावरतांना दिसत आहे. आज आणखी १४ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६३५ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०२ झाली आहे. आज आणखी २४ रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ५१६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच असून शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा घट्ट होतांना दिसत आहे. गाव खेड्यांमध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होऊ लागल्याने त्याठिकाणची जनताही आता भीतीच्या सावटात आली आहे. आज २६ नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून ९ पॉझिटिव्ह तर १७ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ४१ रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून ५ पॉझिटिव्ह तर ३६ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत १८५५ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून २३८६ व्यक्तींच्या स्वाबची आरटी पीसीआर तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी १६ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आले असून ५२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. तालुक्यात आज १४ नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३५ झाली असून ५१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०२ झाली आहे. पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी २५ रुग्ण कोविड केयर सेंटरला उपचार घेत असून २२ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. तर ५५ रुग्णांना होम आयसोलेशन सुविधा देण्यात आली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये कुंभारखणी येथील एक, भालर एक, वांजरी एक, पद्मावती नगरी एक, ब्राह्मणी एक, दामले नगर एक, विराणी टॉकीज परिसर एक, चिंडालीया कॉम्प्लेक्स एक, चिखलगांव दोन, संजीवनी चौक एक, फुकटवाडी एक, विठ्ठलवाडी येथील एक तर नांदेपेरा रोडवरील स्वामी समर्थ नगर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. विठ्ठलवाडीतील रुग्णसंख्या वाढतच असून आता पर्यंत याठिकाणी २५ रुग्णांची नोंद झाली आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता सर्वोतपरी प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.