WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोनाचे रुग्ण वाढतीवरच, तालुक्यात आज ७ व्यक्तींना झाली कोरोनाची लागण !

Image

*प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)*

शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढीस लागली आहे. ग्रामीण भागही कोरोनाच्या विळख्यात आला असून दरदिवसाला गाव खेड्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने तालुक्यातील रुग्णसंख्येचा आलेख वाढत चालला आहे. आज ७ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४२ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०२ झाली आहे. आज आणखी सात रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ५२३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

तालुक्यात सातत्याने कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने कोरोना बाधित रुग्णांचा आकडा फुगत चालला आहे. गाव खेड्यातही कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने ग्रामीण जनताही भीतीच्या सावटात आली आहे. आज २७ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून २ पॉझिटिव्ह तर २५ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज १६७ रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले. त्यापैकी ५ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १६२ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याने, ही शहरवासियांकरिता दिलासादायक बाब आहे. आज आणखी २४ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ४९ रिपोर्ट पेंडिंग झाले आहेत. तालुक्यातील सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६४२ झाली असून ५२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०२ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २३ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून २२ रुग्णांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर ५७ रुग्णांना होम आयसोलेट करण्यात आले आहे. सध्यस्थित ५७ व्यक्ती संस्थात्मक विलीगीकरणात आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये सेवा नगर येथील तीन व्यक्ती तर नेरड, पहापळ, साखरा, वसंतगंगा विहार येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. शहर प्रशासन व आरोग्य प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्याकरिता अहोरात्र प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share