शहरवासीयांना दिलासा, तालुक्यात आज आढळले कोरोनाचे निव्वळ पाच रुग्ण !

*प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)*
कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. काही दिवसांआधी मोठ्या संख्येने आढळणारे रुग्ण आता कमी प्रमाणात आढळू लागले आहेत. आज ५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६४७ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७ झाली आहे. आज आणखी २० रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ५४३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीवरच असली तरी संक्रमणाची गती मंदावली असल्याचे मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात आढळणारे कोरोनाचे रुग्ण काही अंशी मंदावले असल्याचे निदर्शनास येत आहे. तालुक्यात आज पाच व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज १६ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून ५ पॉझिटिव्ह तर ११ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज एकही रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली नाही किंवा कोण्याही व्यक्तीचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आले नाहीत. अद्यापही ३३ स्वाबचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १७ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून २० रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ५० रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत. सध्यास्थितीत ४० व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये चिखलगांव येथील चार तर मजरा (हिवरा) येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्या करिता प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.