अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनासह आरोपी पोलिसांच्या ताब्यात
*प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)*
अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कार्यवाही करून अवैध दारूच्या धंद्यात गुंतलेल्या एका आरोपीला डीबी पथकाने अटक केली असून त्याच्यावर महाराष्ट्र राज्य दारू प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आज डीबी पथकाला एमआयडीसी परिसरातून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचून भालर मार्गाने येणाऱ्या मारुती सुझुकी इको कारची झडती घेतली असता कारच्या सीटवर दोन नायलॉन पिशव्यांमध्ये देशी दारूच्या ५०० शिष्या आढळून आल्या. पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन अवैध देशी दारू बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली असून १५ हजार रुपयांची देशी दारू व तीन लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरातून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचून भालर मार्गाने येणाऱ्या MH ३४ A ३३७३ क्रमांकाच्या कारला थांबवून तिची झडती घेतली असता कारच्या सीटवर नायलॉनच्या दोन पिशव्यांमध्ये ९० मिलीच्या ५०० देशी दारूच्या शिष्या आढळून आल्या. पोलिसांनी कार ताब्यात घेऊन अवैध दारू बाळगल्या प्रकरणी विशाल विनोद लोणारे (२९) रा. सम्राट अशोक नगर याला अटक करून त्याच्यावर म.रा. दारू प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६५(अ),(ई) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी ९० मिलींच्या ५०० नग रॉकेट देशी दारूच्या शिष्या, किंमत १५ हजार रुपये व मारुती सुझुकी इको कार किंमत अंदाजे ३ लाख रुपये असा एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला जिल्हा कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पो.नि.वैभव जाधव, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पो.ना. सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पो.कॉ. पंकज उंबरकर,दीपक वांड्रसवार यांनी केली आहे.