कोरोना संक्रमणाची गती मंदावली, शहरात आज दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह !
शहरात कोरोनाचे संक्रमण सुरूच असून कोरोना बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज दोन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ६५३ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८ झाली आहे. आज आणखी २४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६०५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
शहरात कोरोना संक्रमणाची गती मंदावली असून कोरोना बाधित रुग्णही कमी प्रमाणात आढळत आहे. आज शहरातील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५३ झाली आहे. ६०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून १४ रुग्णांना यवतमाळला हलविण्यात आले आहे. तर २७ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. आज आणखी २९ व्यक्तिनाचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ४८ नमुन्यांचे अहवाल पेंडिंग झाले आहेत. सध्या स्थितीत २१ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये आनंद नगर मधील एक तर साधनकरवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरिता हर संभव प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.