WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोना संक्रमणाची गती मंदावली, तालुक्यात आढळले आज चार कोरोना बाधित रुग्ण !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात कोरोना संक्रमणाची गती मंदावली असून कमी प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने नागरिकांबरोबरच प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला लगाम लावण्यात प्रशासन काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज चार कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५७ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२ झाली आहे. आज आणखी १० रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६१५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण वाढीचा आलेख धीमा झाला आहे. काही दिवसांआधी मोठ्या संख्येने आढळणारे रुग्ण आता कमी प्रमाणात आढळू लागल्याने नागरिकांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे. तालुक्यात आज चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ६५७ झाली असून ६१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४2 झाली आहे. आज १७ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून ३ पॉझिटिव्ह तर १४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज १३ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून १ पॉझिटिव्ह तर १२ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी २२ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ५३ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून १४ रुग्णांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. तर २४ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये राजूर येथील एक, वांजरी येथील एक तर फुकटवाडी येथील दोन व्यक्तींचा समावेश आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share