तालुक्यात आज दोन व्यक्तींचे अहवाल आले पॉझिटिव्ह
शहर व तालुक्यात कोरोना संक्रमणाची गती मंदावली असून कोरोनाचे अत्यल्प रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. आज तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६६० झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन २४ वर आली आहे. आज आणखी सात रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण ६३४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
शहरातील कोरोनाचा विळखा सैल होतांना दिसत असून कोरोनाच्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट कमी व निगेटिव्ह रिपोर्ट मोठ्या प्रमाणात येत असल्याने प्रशासनामध्ये समाधान पाहायला मिळत असून निगेटिव्ह अहवालांचे प्रमाण वाढल्याने प्रशासन कोरोनाच्या लढ्यात यशस्वी होत असल्याचे हे शुभ संकेत आहे. आज पॉझिटिव्ह आलेले दोन्ही रुग्ण रॅपिड अँटीजेन द्वारा करण्यात चाचणीतून आले आहेत. आज १५ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यात २ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या तर १३ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी २१ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ५८ रिपोर्ट पेंडिंग झाले आहेत. सध्यस्थितीत संस्थात्मक विलीगीकरणात ८ व्यक्ती आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ६ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून ६ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. तर १२ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत. आज तालुक्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६६० झाली असून ६३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४ वर आली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये भालर येथील एक तर चिखलगांव येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. शहरातील कोरोनाची साखळी तोडण्याकरिता प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.