WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात आढळले आज कोरोनाचे सात रुग्ण

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहर व तालुक्यात कोरोना संक्रमणाची गती सौम्य झाली असून कमी प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने नागरिकांमधील भीती व प्रशासनावरील तान कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज तालुक्यात कोरोनाचे सात रुग्ण आढळल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६६७ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन १८ वर आली आहे. आज आणखी १५ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६४९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचे मागील काही दिवसांतील पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यांवरून दिसून येत आहे. आज ३६ व्यक्तींच्या तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून २ पॉझिटिव्ह तर ३४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज २५ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून ५ रिपोर्ट पॉझिटिव्ह तर २० व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी ३१ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे ५३ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. आता पर्यंत एकूण ४६८६ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन व आरटी पीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६६७ झाली असून ६४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८ वर आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ५ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये तर एक रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. सध्यस्थितीत सहा व्यक्ती विलीगीकरणात आहेत.

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये कुंभारखनी येथील एक, मजरा दोन, गणेशपूर एक, वांजरी एक, जिल्हा परिषद कॉलनी येथील एक तर रंगारीपुरा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share