तालुक्यातील दोन व्यक्तींना झाली आज कोरोनाची लागण
corona update १३ oct
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)कोरोना संक्रमणाची गती मंदावल्याने तालुक्यात कोरोनाचे रुग्णही कमी प्रमाणात आढळत आहेत. आज दोन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८२ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८ झाली आहे. आज दोन रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्याना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेले दोन्ही रुग्ण रॅपिड अँटीजेन चाचणीच्या प्राप्त झालेल्या रिपोर्ट मधून आले आहेत. २१ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी १५ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले असून ७३ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. आता पर्यंत एकूण ४८८९ व्यक्तींच्या आरटी पीसीआर व रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असून प्रशासन शहर व तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्याकरिता अथक प्रयत्न करीत आहे. आज आढळलेल्या दोन पॉझिटिव्ह व्यक्तींमुळे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८२ झाली असून ६५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८ वर आली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये कायर येथील एक तर गणेशपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. काल १२ ऑक्टोबरला शहरात पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन व्यक्तींमध्ये ग्रामीण रुग्णालयातील दोन कर्मचारी तर प्रगतीनगर मधील एका व्यक्तीचा समावेश होता. ग्रामीण रुग्णालयातील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती आर एस क्वाटरमध्ये राहतो.