रंगगनाथनगर येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता

शहरातील रंगनाथनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या आत्याच्या घरी जाण्याकरिता घरून निघालेली अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आली आहे. रंगनाथनगर येथे आजीच्या घरी राहणारी अल्पवयीन मुलगी १४ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता आत्याच्या घरी स्वयंपाकाकरिता जातो म्हणून घरून निघाली. परंतु खूप वेळ होऊनही ती आत्याकडे पोहचली नसल्याने तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध घेतला असता ती कुठेच आढळून न आल्याने वणी पोलीस स्टेशनला मुलीच्या आत्याने भाची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधकार्य सुरु केले आहे.
रंगनाथनगर परिसरात आपल्या आजीकडे राहून शिक्षण घेणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी त्याच परिसरात राहणाऱ्या आपल्या आत्याकडे स्वयंपाकाकरिता जातो म्हणून घरून निघाली. परंतु खूप वेळानंतरही ती आत्याकडे पोहचली नसल्याने आत्याने आपल्या आईकडे चौकशी केली असता ती तेथे आढळून न आल्याने तिचा परिसरात शोध घेण्यात आला. परंतु तिचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने मुलीच्या आत्याने अखेर पोलीस स्टेशन गाठून भाची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर दोन बहिणी व एक भाऊ असे तिघे भावंड आजी सुभद्राबाई रामचंद्र काकडे (७०) रा. रंगनाथनगर यांच्याकडे रहात होते. अल्पवयीन मुलगी लोकमान्य टिळक महाविद्यालयात १२ वि ला शिकत होती. १४ ऑक्टोबरला दोघीही बहिणी आपली आत्या सुशीला प्रभाकर कोल्हे (५५) रा. रंगनाथनगर यांच्याकडे स्वयंपाकाकरिता जाणार होत्या. मोठ्या बहिणीला समोर पाठवून ती खूप वेळ होऊनही पोहचली नसल्याने तिचा शोधाशोध घेण्यात आला. तिचा परिसरात कुठेही थांगपत्ता न लागल्याने मुलीच्या आत्याने अखेर भाची घरून निघून गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादंवि च्या कलम ३६३ नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल फटिंग व जमादार अनंत इरपाते करीत आहे.