तालुक्यात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले
corona update १५ oct
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616) तालुक्यात आज तीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ६८९ वर पोहचला आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३१ वर आला आहे. कोरोनाची झपाट्याने होणारी रुग्णवाढ मागील काही दिवसांपासून मंदावली असून कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर अंकुश लावण्यात प्रशासनाला यश आल्याचे पाहायला मिळत आहे.आज प्राप्त झालेल्या १७ तपासणी अहवालापैकी २ व्यक्ती पॉझिटिव्ह तर १५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज करण्यात आलेल्या २० रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये १ व्यक्ती पॉझिटिव्ह तर १९ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत २२७३ रॅपिड अँटीजेन टेस्ट, २६६६ आरटी पीसीआर टेस्ट, अशा एकूण ४९५१ कोरोना टेस्ट करण्यात आल्या. आज आणखी १२ व्यक्तींचे सॅम्पल तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ३९ रिपोर्ट पेंडिंग झाल्या आहेत. आज ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८९ झाली असून ६५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१ वर आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ६ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर ६ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्यास्थितीत ८ रुग्ण इन्स्टिट्यूशनल कोरंटाईनमध्ये आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये गणेशपूर येथील दोन तर चिखलगांव येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाला हद्दपार करण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही दक्षता घेण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.