तालुक्यातून कोरोना काढतोय पळ, आज कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही
corona update १६ oct
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)शहर व तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर रोख लावण्याबरोबरच कोरोना रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यास शहर प्रशासन व आरोग्य प्रशासन काही प्रमाणात यशस्वी झाले आहे. तालुक्यात ऑगष्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा वेगाने प्रसार झाला होता. या काळात शहर व तालुक्यात प्रतिदिन सर्वाधिक रुग्ण आढळत होते. पण आता नवीन आढळणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आज तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याने काही प्रमाणात कोरोना आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
शहर व तालुक्यात काही दिवसांपूर्वी रोज मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत होते. ऑगष्ट व सप्टेंबर महिन्यात प्रतिदिन मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळल्याने रुग्ण संख्येचा आलेख तीव्र गतीने वाढला. ऑगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने कोरोनाचे हॉसस्पॉट महिने ठरले. ऑगस्ट महिन्यात कोरोनाचे १५३ रुग्ण आढळले तर सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे तब्बल ४३० रुग्ण आढळले होते. परंतु मागील दोन आढवड्यांची आकडेवारी पहिली तर कोरोना रुग्णांमध्ये कमालीची घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. मागील दोन आठवड्यात तालुक्यात कोरोनाचे निव्वळ ४४ रुग्ण आढळले असल्याने कोरोना शहर व तालुक्यातून पलायन करीत असल्याचे दिसून येत आहे. शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण २२ जूनला आढळला होता. आज जवळपास चार महिन्यात तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ६८९ झाला असून २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती आता नियंत्रणात असून २९ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. ६६० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आता पर्यंत एकूण ४९८७ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज आणखी १९ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ५८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे दरदिवशी अत्यल्प रुग्ण आढळत असल्याने कोरोना तालुक्यातून पळ काढत असल्याचे चित्र एकूणच आकडेवारी वरून पाहायला मिळत आहे.