WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोना संक्रमणाची गती मंदावली, तालुक्यातील सहा व्यक्तींचे अहवाल आले आज पॉझिटिव्ह

Image

corona update १९ oct

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाची गती मंदावल्याने रुग्णवाढीची तीव्रताही कमी झाली आहे. तालुक्यात प्रतिदिन अत्यल्प रुग्ण आढळत असल्याने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सहा व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१० झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. आज आणखी तीन रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६७० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने रुग्ण संख्याही संथ गतीने वाढत आहे. आज करण्यात आलेल्या २३ रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये ६ व्यक्ती पॉझिटिव्ह तर १७ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यवतमाळ येथील कोरोना लॅबचा आज एकही अहवाल प्राप्त झाला नसून आज आणखी ११ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ८० रिपोर्ट पेंडिंग झाले आहेत. आता पर्यंत एकूण ५१२१ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज सहा व्यक्तिंचे रॅपिड अँटीजेन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१० झाली असून ६७० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २१ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये, ११ रुग्णांवर कोविड केयर सेंटरमध्ये तर ७ रुग्णांवर यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. सध्यास्थितीत ११ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये सुंदरनगर येथील चार, तेजापूर येथील एक तर रामपुरा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोना नियंत्रणाकरिता निरनिराळे उपाययोजनात्मक प्रयोग करीत असून नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share