WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रंगनाथ नगर येथील बेपत्ता तरुणी तरुणाबरोबर आली परत

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहरातील रंगनाथ नगर येथे आपल्या आजीकडे राहून महाविद्यालयीन शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी १५ ऑक्टोबरला आत्याच्या घरी जाण्याच्या बहाण्याने परिसरातीलच तरुणाबरोबर पळून गेली होती. तीन दिवसानंतर १८ ऑक्टोबरला रात्री दोघेही स्वतःहून पोलीसांना शरण आल्याने पोलिसांनी मुलीला नातेवाईकांच्या स्वाधीन करून तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. वैभव सुरेश नक्षीने (२३) रा. रंगनाथ नगर असे या अल्पवयीन तरुणीला पळवून नेणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

रंगनाथ नगर येथे आपल्या आजीकडे रहात असलेली अल्पवयीन तरुणी त्याच परिसरात राहणाऱ्या आपल्या आत्याकडे स्वयंपाकास जात असल्याचे कारण सांगून घरातून बाहेर पडली. खूप वेळानंतरही सदर तरुणी आत्याकडे पोहचली नसल्याने तिचा सर्वत्र शोधाशोध सुरु झाला. पण कुठेच तिचा पत्ता न लागल्याने अखेर मुलीची आत्या सुशीला प्रभाकर कोल्हे (५५) यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली. आई वडील मरण पावल्याने तिन्ही भावंडं आजी सुभद्राबाई रामचंद्र काकडे (७०) यांच्याकडे राहून शिक्षण घेत होते. १५ ऑक्टोबरला दोघीही बहिणी आत्याकडे स्वयंपाकास जाणार होत्या. पण घरातील कामे आटोपण्याचा बहाणा करून मोठ्या बहिणीला समोर जाण्यास भाग पाडून सदर मुलगी नंतर आत्याकडे न जाता संधी साधून परिसरातीलच वैभव नक्षीने या तरुणाबरोबर पळून गेली. पोलीस त्यांच्या शोधात असतांनाच १८ ऑक्टोबरला रात्री दोघांनीही पोलीस स्टेशनमध्ये येऊन शहरणागती पत्कारल्याने पोलिसांनी अल्पवयीन मुलीला नातेवाईकांच्या स्वाधीन करून तिला पळवून नेणाऱ्या तरुणावर भादंवि च्या कलम ३६३ नुसार गुन्हा नोंदविला आहे.

आजीने रागावल्याने मित्रासोबत गेल्याचे सदर अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. तारुण्यात पदार्पण केलेल्या मुला मुलींना पालकांचे मार्गदर्शक तत्वेही जिव्हारी लागताना दिसत आहे. तरुण मुले स्वतःच्या मानमर्जीने वागण्यातच धन्यता मानत आहेत. पालकांच्या मार्दर्शनाकडे दुर्लक्ष करून आकर्षणाला बळी पाडतांनाच मुले आयुष्याची दुर्गती करून बसतात. शालेय जीवनात शिक्षणाचे पाठ गिरवण्याऐवजी प्रेमाची गणितं सोडण्याच्या नादात मुले आयुष्याची गणितं चुकवून बसतात. तारुण्यातील आकर्षणाला प्रेम समजून उनाड तरुणांच्या नादाला लागून घरून पळून जाणाऱ्या मुली नंतर पच्छातापाच्या आगीत होरपळताना दिसतात. आकर्षणातून निर्माण झालेलं दुबळं प्रेम आयुष्यात बसणाऱ्या चटक्यांनी ओसरू लागतं व हवाहवासा वाटणारा सहवास नकोसा वाटू लागल्याने नात्यांची ताटातूट होऊन आयुष्याची दुर्गती होते. त्यामुळे शालेय जीवनात शिक्षणालाच महत्व देऊन मुलांनी आधी जीवनात सक्षम बनलं पाहिजे. पालकांनीही तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे. त्यांची वेळोवेळी चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या हालचाली जाणून घेणे अत्यंत जरुरीचे झाले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share