तालुक्यात आज चार कोरोना बाधित रुग्ण आढळले
corona update २२ oct
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात काल २१ ऑक्टोबरला कोरोनाच्या प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्ण संख्येत अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असतानाच आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिलासादायक घट झाल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकांमध्येही समाधान पाहायला मिळत आहे. आज चार व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७५० झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० झाली आहे. आज आणखी ५ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६७९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यात काल प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णात अचानक वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असतानाच आज अतिशय कमी प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज करण्यात आलेल्या ४० रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये ४ व्यक्ती पॉझिटिव्ह तर ३६ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आल्या. आज आरटी पीसीआर चाचण्यांचे अहवाल प्राप्त न झाल्याने ७५ चाचण्यांचे रिपोर्ट पेंडिंग झाले आहेत. आता पर्यंत एकूण ५३९७ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७५० झाली असून ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४० रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये, ११ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये तर १९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये कुरई, पद्मावती नगरी, नांदेपेरा रोड व गुरुकुल कॉलनी येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्या करिता वेगवेगळे नियोजनात्मक प्रयोग करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.