WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात आढळला आज कोरोनाचा एकच रुग्ण

Image

corona update २६ oct

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर रोख लागली असून दरदिवशी मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही कमालीची रोडावली आहे. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अगदीच कमी झाले असून आज तालुक्यात एकच कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामुळे तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ७६० वर पोहचला आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. आज आणखी पाच रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६९५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

आज ३३ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून एक व्यक्ती पॉझिटिव्ह तर ३२ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. एकही तपासणी अहवाल प्रलंबित नसल्याने आज १५ व्यक्तींचे पाठविलेले स्वाब रेपोर्टच पेंडिंग आहेत. आता पर्यंत ५५७५ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर १२ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्यस्थितीत १२ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. तालुक्यात आज एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६० झाली असून ६९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४ झाली आहे.

आज पॉझिटिव्ह आढळलेला व्यक्ती जुना कॉटन मार्केट परिसरातील आहे. प्रशासन कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share