तालुक्यात दोन दिवसात आढळले कोरोनाचे दोन रुग्ण
corona update २८ oct
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
कोरोनाची प्रसारण क्षमता अगदीच कमी झाली असून प्रतिदिन मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्याही चांगलीच रोडावली आहे. अतिशय कमी प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने रुग्णवाढ अतिशय संत गतीने सुरु आहे. काल २७ ऑक्टोबरला कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता तर आज दोन व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६२ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. दोन दिवसांत २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून तालुक्यात आता पर्यंत ७२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
तालुक्यातील कोरोना संक्रमणाची गती अगदीच कमी झाली असून कोरोनाचं संकटही हळू हळू दूर होताना दिसत आहे. कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या बरीच कमी झाल्याने नागरिकांमधील कोरोनाची भीतीही निवळत असल्याचे दिसून येत आहे. आज १५ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून २ पॉझिटिव्ह तर १३ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच २७ व २८ ऑक्टोबरला करण्यात आलेल्या २५ जणांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे रिपोर्ट पूर्णतः निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत २६६८ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहे. तर २९३८ नागरिकांच्या आरटी पीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज आणखी १३ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आले असून तेवढेच अहवाल येणे बाकी राहिले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ४ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर ८ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. सध्यस्थितीत १० व्यक्तीना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले आहेत. आज दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७६२ झाली असून ७२० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९ झाली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये भालर येथील एक तर प्रगती नगर मधील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाला शहरातून हद्दपार करण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.