WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला, आज तालुक्यात आढळला कोरोनाचा एकच रुग्ण

Image

corona update २ Nov

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616) शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाचा वेग अगदीच मंदावला असून झपाट्याने वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर अंकुश लागला आहे. शहरात प्रतिदिन आढळणारे कोरोनाचे रुग्ण फारच कमी झाले असून कोरोनाची साथ हळू हळू निवळत असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. तालुक्यात आज आणखी एका कोरोना बाधित रुग्णाची भर पडल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ७७९ वर पोहचला आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी होऊन २५ वर आला आहे. आज आणखी दोन रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ७५१ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

तपासणी नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले नसून आज पॉझिटिव्ह आलेला रुग्ण रॅपिड अँटीजेन चाचणीतून आला आहे. आज १४ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून एक व्यक्ती पॉझिटिव्ह तर १३ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण २७२१ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. आज आणखी ८ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ६७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ८ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर ८ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्यास्थितीत ८ व्यक्ती संस्थात्मक विलीगीकरणात आहे.

आज पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती हा गणेशपूर येथील रहिवासी आहे. प्रशासन कोरोनाला तालुक्यातून हद्दपार जाण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share