वणीतील तरुण ठरला झी युवा सन्मान पुरस्काराचा मानकरी.....
वणी शहरातील अभियंता असलेल्या तरुणाने एलईडी बल्ब, वातानुकूलित यंत्र तयार करून चक्क कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराच्या काळात"प्लाझ्मा डिसीन्फेक्शन मशीन" हवेतील प्राणवायूचा वापर करीत केमिकल रहित जंतुनाशक यंत्र तयार केले होते. सदर यंत्राच्या नागपूर येथील नामांकित रुग्णालयात यशस्वी चाचण्या झाल्या होत्या. प्रसंगी या कामाची दखल झी युवा ने घेत झी युवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पुरस्काराने वणीतील अभियंता असलेल्या उद्योजक तरुणाला नुकतेच सन्मानित केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे तालुक्याचे ठिकाण आहे. याचं लहान असलेल्या शहरात नावाजलेले मूर्तिकार सुधाकर बुरडकर. सुस्वभावी मूर्तिकार आणि त्यांच्या आकर्षक मुर्त्या व कलेची परिसरात ख्याती आहे. त्यांचा मोठा चिरंजीव सुयोग सुधाकर बुरडकर. सुयोग तसा बारावी पर्यंत हुशार म्हणून नव्हताच,मात्र रक्तात कलेचा वारसा आणि विज्ञानाची आवड असल्याने त्याने ११वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावी पास झाला मात्र एक गुण कमी असल्याने त्याला अभियांत्रिकीच्या प्रवेशाला मुकावे लागले. परंतु मनातील जिद्द ,धडपड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. सुयोग ने घरच्यांचा विरोध पत्करून दिल्ली गाठली. आणि खुल्या विद्यापीठातून अभियांत्रिकी चे शिक्षण पूर्ण केले. तेथील शिक्षण त्याला फार मोलाचे ठरले. कामासाठी प्रवास सुरु झाला. अन कामासाठी मुंबई गाठली. तिथे जाऊन सुयोग ने कंपनी स्थापन करून एलईडी बल्ब ची निर्मिती केली. बल्ब ची मागणी वाढली. त्यातच विद्युत बचत करणारे वातानुकूलित यंत्र तयार केले. आणि हे यंत्र स्मार्ट एसी लॉजिक बोर्ड डीएनडी या वेबसाईटवर समाविष्ट झाले. बंगलोर येथील बड्या कंपनी मध्ये सुद्धा ब्रिस्कर इलेक्ट्रॉनिक या सुयोग च्या कंपनी ला मजल मारता आली. तसेच Infosys , Intuit , Goldman sachs हे मोठे नाव सुद्धा सोबत जोडल्या गेलं. सुरुवातीला एक वर्ष प्रशिक्षण करण्यासाठी बिनपगारी काम केले. आणि अश्या या थक्क करणाऱ्या प्रवासाची दखल झी युवा ने घेत सुयोग सुधाकर बुरडकर या ध्येयवेड्या अभियंता असलेल्या तरुण उद्योजकाला झी युवा २०२० पुरस्काराने सन्मानित केले आहे. पुढील काळात वातानुकूलित यंत्र व इतर उपकरणे तयार करण्यासाठी तो विदर्भाच्या राजधानीत स्थित होणार असल्याची माहिती आहे.
तरुणांनी जिद्द, चिकाटी आणि मनात असलेली आवड जोपासून उद्योग सुरू करून त्यात आपले भविष्य बघावे.
सुयोग सुधाकर बुरडकर