मालवाहू वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन व्यक्ती गंभीर जख्मी, त्यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ
मालवाहू वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जख्मी झाल्याची घटना वणी वरोरा रोडवरील नायगाव नजीक असलेल्या पॉलटेक्नीक कॉलेज जवळ १० नोव्हेंबरला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनीत मोटर मेकॅनिकल म्हणून कार्यरत असलेले दोन व्यक्ती कर्तव्य बजावून दुचाकीने आपल्या गावी परतत असताना मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाने त्यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोनही व्यक्ती गंभीर जख्मी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे.
शहरातील वणी घुग्गुस रोडवरील टोल टॅक्स जवळ असलेल्या पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनीत मोटर मेकॅनिक म्हणून काम करणारे दोन व्यक्ती कामाच्या तासिका आटपून माजरी या आपल्या गावी जात असताना मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या चालकाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यात दोनही व्यक्ती गंभीर जख्मी झाल्याने त्यांना सुगम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे. लॉकडाऊन शिथिल होताच रस्ते अपघातांच्या घटना वाढीस लागल्या आहेत. दारूच्या नशेत निष्काळजीपणाने वाहने चालविली जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहेत. वाहन चालकांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप जीवांचे नाहक बळी जात आहे. इतर कारणाने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येपेक्षा रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. दारूच्या नशेत लापर्वाहीने वाहने चालविली जात असल्याने कित्येकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.
पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनीत खूप वर्षांपासून मोटर मेकॅनिकल म्हणून कामाला असलेले दोनही व्यक्ती माजरी येथून दुचाकीने अपडाऊन करतात. १० नोव्हेंबरला कामाच्या तासिका आटपून ७.३० वाजताच्या सुमारास दोघेही मिस्त्री दुचाकीने घरी जात असताना नायगाव जवळील पॉलटेक्निक कॉलेज जवळ दारूच्या नशेत भरधाव वाहन चालवित चालकाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यात कल्लू सोनी (४२) व रोशन मेश्राम (२८) हे दोघेही गंभीर जख्मी झाले. त्यांना तात्काळ सुगम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कल्लू सोनी याला डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला अत्यवस्थ स्थितीत नागपूरला हलविण्यात आले आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मालवाहू वाहनाला ताब्यात घेतले. वाहन चालकाने अतिमद्य सेवन केल्याचे आढळून आल्याने त्यालाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी वाहन चालका विरुद्ध कलम २७९, ३३७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जमादार प्रकाश गोर्लेवार करीत आहे.
कल्लू सोनी हा मूळचा मध्यप्रदेशातील परासिया तालुक्यातील रहिवासी असून तो पुष्कळ वर्षांपासून पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनीत मोटर मेकॅनिक म्हणून कार्यरत आहे. त्याला तीन चार वर्षाचा एक छोटा मुलगा असून तो माजरीला किरायाने राहतो. दिवाळी साजरी करण्याकरिता तो गावाला जाणार होता. पण दिवाळीच्या तोंडावरच हा दुर्दैवी प्रसंग घडल्याने परिवार दुःखाच्या सावटात आला आहे. कल्लू सोनी याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.