तालुक्यात आढळले आज कोरोनाचे चार रुग्ण
corona update १७ Nov.
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
कोरोनाची प्रसारण क्षमता कमी झाल्याने कोरोनाचे रुग्णही कमी प्रमाणात आढळत आहेत. शहर व तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असून प्रतिदिन मोठ्या संख्येने आढळणाऱ्या रुग्णांमध्येही कमालीची घट झाली आहे. अतिशय कमी प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्या वाढही संत गतीने होत आहे. तालुक्यात आज चार व्यक्तींचे कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८८२ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५० वर आली आहे. आज आणखी आठ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ८०९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी झाल्याने कोरोनाचे अत्यल्प रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसविण्यात प्रशासनाला यश आल्याचे दिसून येत आहे. आज पॉझिटिव्ह आलेले चारही रुग्ण रॅपिड अँटीजेन द्वारा करण्यात आलेल्या चाचणीतुन आले आहेत. आजही आरटी पीसीआर रिपोर्ट प्राप्त झाले नसून आज १०७ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १३० अहवाल प्रलंबित आहेत. आज चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८८२ झाली असून ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५० झाली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये टिळक नगर येथील एक, शास्त्रीनगर एक, राजूर कॉलरी एक तर कोना येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही याकरिता नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबरोबरच लक्षणे आढळल्यास त्वरित कोरोना चाचणी करण्याचे आव्हान तालुका वैद्यकीय अधिकारी अमित शेंडे यांनी केले आहे.