तालुक्यातील तेरा व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह
corona update १८ Nov.
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात कोरोनाचा उतार चढाव सुरूच असून कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने रुग्णांचा आकडा फुगत चालला आहे. प्रतिदिन कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोनाची साथ निवळली नसल्याने नागरिक आजही भीतीच्या सावटात वावरत आहेत. आज तालुक्यात १३ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८९५ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५७ झाली आहे. आज आणखी सहा रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ८१५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यात सातत्याने कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाची प्रसारण क्षमता कमी झाली असली तरी कोरोनाची लागण होणे सुरूच असल्याने नागरिकांमध्ये आजही कोरोनाची भीती कायम असल्याचे दिसून येत आहे. आज प्राप्त झालेल्या तपासणी अहवालामध्ये तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर आज करण्यात आलेल्या ४२ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये १० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आता पर्यंत ३४०१ व्यक्तींची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून ३०४१ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. आज आणखी २० व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १२७ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. आज १३ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ८९५ वर पोहचला आहे. ८१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५७ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १७ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये, १३ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये तर २७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये माळीपुरा येथील एक, चिखलगाव एक, भालर एक, देशमुखवाडी एक, वसंतगंगा विहार एक, गुरुवर्य कॉलनी एक, लक्ष्मीनगर एक, प्रगतीनगर एक, रवीनगर दोन, नांदेपेरा एक, भांडेवाडा येथील एक तर वणी वरोरा रोडवरील एका व्यक्तीचा समावेश आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरिता प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.