तालुक्यातील २२ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

corona update १९ Nov.
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात कोरोनाच्या प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भयावता दर्शवित आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या तज्ज्ञाचा अंदाज खरा ठरवतांना दिसत आहे. आज तब्बल २२ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने ९०० चा पल्ला गाठला असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१७ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० वर पोहचली आहे. आज आणखी १२ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ८२४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
थंडी वाढू लागल्याने कोरोनाची लागण होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आज १०७ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून १४ पॉझिटिव्ह तर ९३ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ७३ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून ८ पॉझिटिव्ह तर ६५ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी १६ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ३६ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आज तब्बल २२ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९१७ झाली असून ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, २४ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर १६ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शास्त्रीनगर येथील दोन, पटवारी कॉलनी एक, विठ्ठलवाडी दोन, रवीनगर तीन, प्रगतीनगर एक, टिळकनगर एक, मनीषनगर एक, विद्यानगरी एक, चिखलगाव चार, नायगांव खुर्द तीन, भांडेवाडा एक, शिरपूर एक तर चंद्रपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. विठ्ठलवाडी येथे कोरोनाने परत एकदा डोके वर काढले असून येथील रुग्णाच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. विठ्ठलवाडी परिसरात आता पर्यंत २९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना परत सक्रिय होताना दिसत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.