तालुक्यातील दोन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

corona update २७ Nov.
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
कोरोनाची प्रसारण क्षमता कमी झाल्याने कोरोनाची लागण होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. प्रतिदिन अतिशय कमी प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने कोरोनाची परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. आज तालुक्यात दोन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९५५ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५ वर आली आहे. आज कोरोनातून बरे झालेल्या १६ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ८६७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेले दोन्ही रुग्ण रॅपिड अँटीजेन चाचणीतुन आले आहेत. आज २५ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून दोन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आज प्राप्त झालेले ५१ ही तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी ११ नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ५१ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आता पर्यंत ७३१९ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्या ३६८० असून रॅपिड अँटीजेन चाचण्या ३६३९ आहेत. तालुक्यातील ६५ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ५ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर २३ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमध्ये एकता नगर येथील एक तर कुंभा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.