WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सात व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

Image

corona update २९ Nov.

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी झाल्याने अतिशय कमी प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. रुग्णवाढीचा वेग मंदावला असून संथ गतीने रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. काल २९ नोव्हेंबरला सात व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६९ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६२ झाली आहे. काल आणखी सहा रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ८८४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मुत्यू झाला आहे.

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून रुग्णसंख्याही हळुवारपणे वाढत आहे. कोरोनाची परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असून रुग्णवाढीवरही नियंत्रण ठेवण्यात प्रशासन यशस्वी ठरल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. काल प्राप्त झालेल्या ३२ तपासणी अहवालामध्ये सहा व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. तर काल करण्यात आलेल्या आठ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. काल आणखी ११ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ३४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहेत. आता पर्यंत ७४०२ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यात ३७०२ व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचण्या व ३६९९ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांचा समावेश आहे. ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह ६२ रुग्णांपैकी ३१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ९ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर २२ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहेत.

पॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये एकतानगर येथील दोन, गुरुनगर एक, एसएचओ क्वाटर दोन, नांदेपेरा एक तर कायर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share