WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मारेगाव-वणी मार्गावर अपघात एक ठार तर एक गंभीर .....

Image

मुलाचा मृत्यू :- बाप लेकावर काळाचा घाला...

सुरज चाटे :- वणी मरेगाव मार्ग हा सारखा वर्दळीचा मार्ग म्हणून परिचित आहे मारेगाव मार्गावर दिनांक 10 ला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र परिवहन महामंडळ च्या वाहनाने समोरील ऑटो क्रमांक MH29AN0373 या वाहनांला गाठून पुढे जाण्याच्या बेतात ऑटोचे नियंत्रण सुटून ऑटो रस्त्याच्या कडेला पडला त्यात वाहनचालक गोलू खान वय अंदाजे 25 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले त्यांना लोढा हॉस्पिटल वणी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मारेगाव येथे भांडे विकण्याकरिता आलेले वणीचे महाबुब खान व गोलू खान हे दोघे बाप लेक मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चुना फॅक्टरी जवळ मारेगाव वरून वणीला आपले भांडे विकण्याचे काम आटपून भांड्याच्या गाडीने ऑटोने जात असताना मारेगाव ते वणी जाणाऱ्या महामंडळाच्या बसने समोरील भांड्याच्या ऑटोला गाठून गाडी समोर घेण्याच्या बेतात गाडी महामंडळाची बस इतकी लगत आली की ऑटोवाल्याचे सदर वाहनावरील नियंत्रण सुटले व तीनचाकी वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले त्यात वाहनात उपस्थित गोलू खान यांना गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले असून त्याचे वडील महाबुब खान यांना गंभीर इजा असल्याने त्यांना वणीच्या लोढा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सदर अपघाताची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यात मृतकाला शव विच्छेदनासाठी मारेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई मारेगाव पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share