WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जल ही जीवन है चा संदेश देत एक हाथ मदतीचा.....

ImageImage

‘आधार' हरवल्यांसाठी आधारवड बना

चकुले कुटुंबीयाचा सामाजिक उपक्रम, निळोणा येथील मातोश्री वृद्धाश्रमात गरजूंना मदत

सुरज चाटे वणी :- ‘कठीण समय येता, कोण कामास येतो' अशी म्हण आहे. आयुष्याची जमा-पुंजी कमवून पोटच्या गोळ्यांना मोठे केले. ज्यांच्यासाठी आयुष्याचा खडतर प्रवास केला. त्यांनीच आयुष्याची संध्याकाळी आपलेत्व नाकारले. वृद्धाश्रमाचा मार्ग दाखविला. मात्र, याउलट चकुले कुटुंबीयांनी अशा वृद्धांसाठी आधारवड बना, असा सामाजिक संदेश दिला. निळोणा येथील वृद्धांसाठी पिण्याच्या पाण्याचे वाटर कुरल बंद असल्याचे कळले. त्यांनी रविवारी (ता. १०) पाण्याची व्यवस्था करुन देत ठंड पाण्यासाठी वाटर कूलर, कापड, भोजनदानासह त्यांच्याशी संवाद साधला.

यवतमाळ शहरालगत सात किमी अंतरावर निळोणा हे गाव आहे. हे गांव पर्यटनक्षेत्रापेक्षा काही कमी नाही. येथील माातोश्री वृद्धाश्रम आयुष्य हरविलेल्यांसाठी आधारवड ठरत आहे. यवतमाळ येथील शिवनेरी सोसायटीतील शंकर चकुले कुटुंबियांना गरजूंना मदत करुन सामाजिक दायित्व जपले. येथील वृद्धाश्रमात आपल्या विदेशात असलेल्या मूलांसह आज उपस्थिती दर्शविली. निमित्त होते ते फक्‍त वृद्धांना, गरजूना ‘मदत करण्याचे. त्यांनी ब्लँकेट, कपड्यांसह, वाटर कूलर आदी वस्तू दिल्या. यावेळी चकुले कुटुंबियातील अनेक नातेवाईक उपस्थित होते. वृद्धांशी संवाद साधताना वृद्ध म्हणाले की, ‘आमच्या नशिबी परक्याचेच प्रेम‘ का? आम्ही काय गुन्हा केला? आमच्याच कारट्यांनी आम्हाला घराबाहेर हाणले? पिकलेल्या झाडांची पाने आम्ही. आजचा भरावसा ना उद्याचा' चार चौघांत मीसळलं की आपलेच अशी जाणीव होती. हे ऐकून सर्वांचे डोळे नकळतच पाणावले.

-------------------------------------

सामाजिक उपक्रम या उपक्रमत शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तब्बल 600 नागरिकांनी उपस्थिति दर्षवली. यावेळी स्नेहभोजनाचा आनन्द घेतला. वृद्धश्रमतिल कार्यबाबत माहिती जानून घेतली. वृद्धनी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल चकूले कुटुबियाचे आभार मानले

-----------------------------

देवा तुच मार्ग दाखव गा आम्हाला हवे असते ते दोन शब्द प्रेमाचे. आम्हाला ना पैश्याचा मोह, ना वस्तूचा. आम्ही फक्त दोन शब्दांसाठी आतुर असतो. आधुनिकेतेने तेही हिरावून नेलं. परकेच येऊन आपलेपण देऊन जात. आमच्याच पोरांनी आम्हाला घरातून काढल. आता देवा तुच मार्ग दाखव, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. वृद्धांनी अशा निरागस शब्दात आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या. यावेळी वृदधश्रमातील अनेक मान्‍यवरांचा सत्‍कार करण्‍यात आला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share