WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महापरिनिर्वाण दिना निमित्त असंख्य अनुयायांनी वाहिली महामानवाला आदरांजली

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ त्यांना अभिवादन करण्याकरिता असंख्य अनुयायी एकत्र आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात उपस्थित अनुयायांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. तसेच त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर त्रिशरण पंचशील धम्मपूजा घेण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी व विद्यमान रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबरच परिसरातील अनुयायांनीही उपस्थिती दर्शविली होती.

बाल वयापासूनच विषमतेची झळ सोसणाऱ्या बाबासाहेबांनी आपला समाज विषमतेच्या आगीत होरपळु नये म्हणून विषारी विषमताच जाळून टाकली. सर्वाना कायद्याच्या चौकटीत आणून सामान अधिकार व सामान वाटा उपलब्ध करून दिल्या. आपलं संपूर्ण आयुष्य दलित, शोषित व बहुजन समाजाच्या उत्थानाकरिता वाहून घेतलं. गुलामीच्या जोखळातून मुक्त करून माणसाला माणूस म्हणून जगण्याचं सामर्थ्य मिळवून दिलं. स्त्रियांना स्वतंत्र हक्क बहाल केले. शिक्षणाच्या वाटा उपलब्ध करून दिल्या. मागास्वर्गीयांकरिता आरक्षणाची तरतूद केली. देश व समजाच्या उन्नतीत मोलाचे योगदान देणाऱ्या बाबासाहेबांचे वृनं फेडणे शक्य नसले तरी विषमतेची पाळेमुळे खणून सामाजिक सलोखा टिकून राहील ही संकल्पना अंगी कारल्यास बाबासाहेबांचं एकात्मता नांदण्याचं स्वप्न पूर्णत्वास येईल व हीच या महामानवाला खरी श्रद्धांजली ठरेल. हे विचार याठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केले. बहुजन समाजाला न्याय व हक्क मिळवून देणाऱ्या बाबासाहेबांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी असंख्य अनुयायांनी आदरांजली वाहिली. त्यांना अभिवादन करण्याकरिता पंचशील झेंड्याजवळ अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share