शहरात विदर्भ तेली महासंघातर्फे संताजी महाराज जयंती साजरी
शहरातील जगनाडे चौकात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. विदर्भ तेली समाज महासंघ वणीच्या वतीने आयोजित या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हा सचिव रवी बेलुरकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वणी नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार, नगर परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे उपस्थित होते.
संताजीच्या प्रतिमेला हारार्पण व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. समाज बांधवांच्या वतीने संताजी जगनाडे महाराजांना अभिवादन करण्यात आले. संताजीच्या जयंतीचे औचित्य साधून गजानन कासावार यांनी त्यांनी लिहिलेल्या तुकाराम महाराजांच्या साहित्याविषयी माहिती देण्यात आली. तसेच संताजीच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याची जाणीव करून देण्यात आली. रवी बेलुरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संताजी जगनाडे महाराज समाजासाठी दीपस्तंभ असल्याचे सांगतानाच त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणण्याचे आवाहन केले.
या जयंती सोहळ्यात नगरसेवक प्रशांत निमकर, राकेश बुग्गेवार, रवींद्र लिचोडे, माजी न.प. उपाध्यक्ष विनोद निमकर, पोर्णिमा शिरभाते, अक्षदा चव्हाण, भारती तलसे, शरद तराळे, सचिन हजारे, राजु येनुरकर, निलेश डवरे, पंढरीनाथ बोरपे, गजेंद्र भटघरे, वसंत तलसे, विनायक दांडेकर, श्रीरंग गिरटकर, सुनील बडघरे, अजित बडघरे, राहुल दांडेकर, वाघ साहेब, गोपाल पाटील, कैलास पिपराडे, गजानन पाटील, पंकज कासावार, अमित लिचोडे, आशिष डंभारे, रमेशज पाटील, गणेश पडोळे, मारोती शिखरे, मनिष शेरजे, दिपक पाऊनकर, नयन डंभारे, प्रितम म्हाकारकर, श्रयेश हरणे, अमित उपाते, संकेत गंधारे, गोपाल पाटील इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजक विदर्भ तेली महासंघाचे वणी तालुका अध्यक्ष संतोष डंबारे यांनी केले.