लग्नाचे आमिष दाखवून अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल
अनैतिक संबंधातून महिलेची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच अनैतिक संबंधाचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. लग्नाचे आमिष दाखवून अनैतिक संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराविरुद्ध एका तरुणीने पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील रहिवाशी असलेली व सध्या शहरातील ओमनगर येथे रहात असलेल्या तरुणीचे शहरातील रुपेश सुरेश क्षीरसागर (३१) या तरुणासोबत मोबाईलच्या माध्यमातून सूत जुळले. मोबाईल वरील संभाषणातून त्यांच्यात प्रेमाचे अंकुर फुटले व लग्नाच्या आणाभाका घेऊन तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराविरुद्ध तरुणीने पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुपेश क्षीरसागर याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील ओमनगर येथे आईवडिलांसह राहणाऱ्या एका मुलीचे शहरातीलच रुपेश क्षीरसागर याच्या सोबत मोबाईल वरून सूत जुळले. त्यांच्यातील मोबाईलवरील संभाषणातून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर त्यांच्यात भेटीगाठी वाढल्या. तो नेहमी तिला फोन करून बोलवायचा व मुकुटबन रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये न्यायचा. लग्न करण्याची ग्वाही देत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. त्यातूनच ती गर्भवती राहिली असताना शहरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात करण्यात आला. लग्नाचे आमिष दाखवून तिला पाच महिने सोबत ठेऊन वारंवार अनैतिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केल्यानंतर आता लग्न करण्यास साफ नकार देणाऱ्या प्रियकराविरुद्ध तरुणीने अखेर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत रीतसर तक्रार नोंदविली आहे. प्रेम व अनैतिक संबंध प्रस्थापित करतांना संप्रदायाचा विचार न आलेला युवक आता संप्रदायाच्या कारणावरून लग्नास नकार देऊ लागल्याने तरुणीने हतबल होऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी आरोपी रुपेश क्षीरसागर याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३७६ (२)(N), ३१३ सह कलम ३(१)(W)(i), ३(१)(W)(ii), ३(२)(v) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहे.