WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात दोन दिवसांत १५ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

Image

corona update २१ Dec.

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात कोरोनाचे संक्रमण सुरूच असून कमी अधिक प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने रुग्णांचा आकडा फुगत चालला आहे. दोन दिवसांत १५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील एकूण रुग्णसंख्येने ११०० चा पल्ला ओलांडला आहे. २० डिसेंबरला चार तर २१ डिसेंबरला अकरा व्यक्तीचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ११०३ वर पोहचली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ८० झाले आहे. दोन दिवसांत १४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आता पर्यंत १००० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर २३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

तालुक्यात प्रतिदिन कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाचा आजार बळावताना दिसून येत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. शहरातील विठ्ठलवाडी परिसरात प्रतिदिन कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने हा परिसर कोरोनाचा हॉसस्पॉट बनतांना दिसत आहे. आता पर्यंत या परिसरात ४३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील १५ दिवसांत या परिसरात १५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. विठ्ठलवाडी येथे काही दिवसांआधी एका ठणठणीत महिलेचा अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाला. ती कोरोनानेच मरण पावल्याची चर्चा विठ्ठलवाडी परिसरातून ऐकायला मिळते आहे. आज ४१ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात १० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तसेच आज करण्यात आलेल्या २५ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला आहे. आज आणखी २५ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ४१ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. आता पर्यंत एकूण ८५८५ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत १५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ८० झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३० रुग्ण कोविड केयर सेंटरला, २७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर २३ रुग्ण यवतमाळ व इतरत्र भरती आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये विठ्ठलवाडी येथील दोन, जैन ले-आऊट एक, सहारा पार्क एक, गुरु नगर एक, मुरधोंनी तीन, भालर टाउनशिप एक, चिखलगांव एक तर गणेशपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच काल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये विठ्ठलवाडी येथील तीन तर भद्रावती येथील एका रुग्णाचा समावेश होता. कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढू लागले असून नागरिकांनी सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share