WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे देत आहेत अपघातास आमंत्रण

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहरातून जाणाऱ्या वणी वरोरा या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले असतांनाही संबंधित विभाग खड्डे बुजविण्याचे साधे सौजन्यही दाखवत नसल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहे. मागील कित्येक दिवसांपासून या रस्त्यावरील खड्डे उघड्या डोळ्याने दिसत असतानाही याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. या रस्त्यावरील आशीर्वाद बार व लोकमान्य टिळक महाविद्यालया जवळ रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डे रहदारीला अडथळे निर्माण करण्याबरोबरच अपघातालाही आमंत्रण देत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात वाहने अनियंत्रित होऊन खाली पडणे किंवा एकमेकांना भिडणे आता नित्याचेच झाले आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात कित्येक दुचाकी वाहनांना अपघात होऊन दुचाकीस्वार जख्मी झाले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खाड्यांमधून मार्ग काढतांना व खड्डे चुकवितांना मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातील गल्लीबोळातील रस्त्यांचे दुरुस्तीकरण व डागडुजीकरण सुरु असताना मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांकडे मात्र दुर्लक्ष होतांना दिसत आहे. शहरातून जाणाऱ्या वणी वरोरा रोडवर पडलेले मोठ मोठे खड्डे उघड्या डोळ्याने दिसत असतांनाही संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्यावर आशीर्वाद बार व लो.टि. कॉलेज जवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. कित्येक दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले असतांनाही संबंधित विभाग याकडे डोळेझाक करीत आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला असून मोठी दुर्घटना घडल्या नंतरच खड्डे बुजविण्याचे सोपस्कार पार पाडले जातात की काय, असे वाटू लागले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे शहराचं लौकिक लोप पावतांना दिसत आहे. खड्ड्यांचं शहर म्हणून शहर व तालुक्याची ओळख निर्माण होतांना दिसत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांकडे होणारे दुर्लक्ष व संथ गतीने सुरु असलेली रस्ते दुरुस्तीकरणाची कामे यामुळे नागरिक आता चांगलेच वैतागले आहेत. मागील सहा ते सात महिन्यांपासून सुरु असलेले विठ्ठलवाडी येथील मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. खडीकरण पूर्ण होण्याकरिता सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागला आता डांबरीकरण कोणत्या साली पूर्ण होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शहर व तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share