WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरातील क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची धाड, बिल्डरला घेतले ताब्यात, अप्पर पोलीस अधीक्षकांची धडक कार्यवाही !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

वणी वरोरा रोडवरील गंगशेट्टीवार मंगलकार्यालय परिसरातील एका बिल्डरच्या कार्यालयामध्ये क्रिकेट सामन्यांवर जुगार खेळला जात असल्याच्या गुप्त माहितीवरून अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वतः पोलीस पथकासह बिल्डरच्या कार्यालयावर धाड टाकून क्रिकेट सामन्यांवर पैशाची बाजी लावणाऱ्या इतर व्यक्तींसह बिल्डर जमीर खान उर्फ जम्मू यास ताब्यात घेतले आहे. छुप्या पद्धतीने क्रिकेटवर सट्टा खेळला जात असल्याच्या विश्वसनीय माहितीवरून अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जमीर खान यांच्या अमीर बिल्डर या कार्यालयावर आज दुपारी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान धाड टाकली असता त्या ठिकाणी क्रिकेटवर सट्टा खेळला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अन्य चार ते पाच जणांसह जमीर खान उर्फ जम्मू यालाही ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. पोलीस त्याच्या कार्यालयाबरोबरच घराचीही झडती घेत असल्याचे समजते. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनंतरही तालुक्यात छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरु असल्याचे या कार्यवाहीने उघड झाले आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या या धडक कार्यवाहीमुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

शहरातील जमीर खान यांच्या बिल्डर अँड डेव्हलपर्स कार्यालयामध्ये सुरु असलेल्या क्रिकेट सट्टयावर अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वतः पोलीस पथकासह छापा मारून क्रिकेट सामन्यांवर जुगार खेळणाऱ्या अन्य चार ते पाच जणांसह जम्मू खान यास ताब्यात घेतले. जम्मू खान यांच्या कार्यालयात क्रिकेट सामन्यांवर जुगार खेळला जात असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्याने अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी आपल्या पथकासह साध्या वेशात ट्रॅव्हल्सने वणी येथे येऊन गंगशेट्टीवार मंगलकार्यालय परिसर गाठला. लग्न समारंभात आल्यागत भासवत कसलीही सावरासावर करायची संधी न देता जम्मू खान यांच्या कार्यालयावर धाड टाकली. त्याठिकाणी क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या अन्य आरोपींसह जम्मू खान यालाही पोलीस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्याच्या कार्यालयाबरोबरच घराचीही झडती घेतली जात आहे. अगदी फिल्मी स्टाईलने पोलीस अधिकाऱ्यांनी हा छापा मारून कथानकातील वास्तविकतेचे दर्शन घडविले आहे. पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंदेवाल्याना अल्टिमेटम दिला होता. तरीही तालुक्यांमध्ये छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरु असल्याने पोलीस अधीक्षकांनी आता त्यांना धडा शिकविण्याचा विडाच उचलला असल्याचे पाहायला मिळत आहे. क्रिकेट सट्ट्यावरील शहरातील हि मोठी कार्यवाही मानली जात आहे. रात्री उशिरा पर्यंत घर व कार्यालयाची झडती घेणे सुरूच होते. त्यामुळे या धाडीत काय निष्पन्न होते व संबंधितांवर कोणते गुन्हे दाखल होतील, हे तपासांतीच कळणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share