मंगलमपार्क मधिल फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या सट्टा मटक्यावर पोलिसांनी टाकली धाड
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
शहरातील गंगशेट्टीवार मंगलकार्यालय परिसरातील आमिर बिल्डरच्या आलिशान कार्यालयात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टयावर जिल्हा पोलिस पथकाने धाड टाकल्याचे प्रकरण ताजे असतांनाच आज शहर पोलिसांनी मंगलमपार्क भाग 1 मधिल फ्लॅट मध्ये छुप्या मार्गाने सुरू असलेल्या सट्टा मटक्यावर धाड टाकुन अवैध धंद्यांविरुध्द सुरू असलेली मोहीम आणखी तिव्र केली आहे. आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान पोलिसांनी टाकलेल्या या धाड़ीत 9 जनांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटिल यांनी पदभार स्विकारताच जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे फर्मान बजावले होते. तरीही छुप्या मार्गाने अवैध धंदे सुरुच असल्याचे कळाल्याने त्यांनी स्वतः पोलिस पथक तयार करुन अवैध धंद्यावार धाड़ी टाकल्या. वणी येथीलही क्रिकेट सट्टयावर धाड टाकुन त्यांनी शहर पोलिसांना अलर्ट केले होते. त्यानंतर पोलिसांनी अवैध धंद्यांविरुध्दची मोहीम तिव्र करत अवैध धंदे चालविणारयंच्या कुंडल्या काढण्यास सुरुवात केली. ठाणेदारांनी स्वतः लक्ष घालत पोलिसांना छुप्या मार्गाने सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पाळत ठेवण्यास सांगीतले. त्यानूसार पोलिसानी छुप्या मार्गाने सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा शोध घेत मंगलमपार्क भाग 1 मधिल फ्लॅटमध्ये लपुन सुरू असलेल्या सट्टा मटक्यावर धाड टाकुन त्याठिकाणी सट्टा खेळणाऱ्या आठ ते नऊ जनांना ताब्यात घेतले. तसेच सट्टयाकरिता वापरले जाणारे सहित्यही जप्त केले. पोलिसांच्या या धडक कार्यवाहीने अवैध धंदेवाल्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरुच होती.