डॉक्टरांच्या औषधोपचारामुळेच गेला मुलाचा जीव, पित्याने केली पोलिसात तक्रार !

शहरातील दिपक चौपाटी परिसरातील नृसिंह व्यायाम शाळेजवळ असलेल्या एका दवाखान्यात उपचाराकरिता गेलेल्या तरुणाचा डॉक्टरांच्या औषधोपचारामुळे मृत्यू झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आली आहे. रंगनाथ नगर येथील तेवीस वर्षीय तरुणाला पोटात मळमळ वाटत असल्याने एका खाजगी दवाख्यान्यात उपचाराकरिता नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला दोन इंजेक्शन देऊन काही औषधी गोळ्या लिहून दिल्या. त्याला घरी आणल्यानंतर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्या दिल्या असता त्याची प्रकृती आणखीच खालावली. त्याला तत्काळ शहरातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉ. मत्ते यांच्या चुकीच्या औषधोपचारांमुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार मुतकाच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला नोंदविली आहे. तसेच डॉ. मत्ते यांनी दिलेल्या इंजेक्शन व गोळ्यांमुळेच सदर तरुणाचा मृत्यू झाल्याची धारणा बसल्याने संतप्त झालेल्या परिसरातील काही नागरिकांनी डॉ. मत्ते यांच्या दवाखान्याची तोडफोड करून त्यांना धक्काबुक्की केल्याचे समजते. पोलीस स्टेशनला तशी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे ठाणेदार वैभव जाधव यांनी सांगितले आहे. तसेच शवविच्छेदन अहवालात चुकीच्या औषधोपचारामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यास दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही ठाणेदारांनी स्पष्ट केले आहे.
रंगनाथ नगर येथील आकाश हनुमान पेंदोर (२३) याला पोटात मळमळ वाटत असल्याने त्याचा मोठा भाऊ अमर हनुमान पेंदोर याने त्याला दुपारी १२ वाजताच्या सुमारास नृसिंह व्यायाम शाळेजवळील डॉ. मत्ते यांच्या दवाखान्यात उपचाराकरिता नेले. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला दोन इंजेक्शन दिले, व काही औषधी गोळ्या लिहून दिल्या. त्याला घरी आणल्यानंतर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्या दिल्या असता त्याची प्रकृती आणखीच खालावल्याने त्याला तत्काळ शहरातील मल्टीस्पेशॉलिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉ. मते यांनी दिलेल्या इंजेक्शन गोळ्यांमुळेच आपला मुलगा दगावल्याची तक्रार मृतकाचे वडील हनुमान चिंदुजी पेंदोर (५५) यांनी पोलीस स्टेशनला नोंदविली आहे. तरुणाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या डॉक्टरला अटक करण्याचा आग्रह धरून नातेवाईकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन खूप वेळपर्यंत करू न दिल्याने अखेर तडजोडीनंतर ग्रामीण रुग्णालयातुन मृतदेह यवतमाळला शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला. त्याठिकाणी शवविच्छेदनाची विडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांच्या चुकीच्या औषधोपचारामुळेच आकाश पेंदोर याचा मृत्यू झाल्याची धारणा बसल्याने संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी डॉ. मत्ते यांच्या दवाखान्याची तोडफोड करून त्यांना धक्काबुक्की केल्याचे समजते. याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पो.नि. वैभव जाधव यांनी सांगितले आहे. तसेच शवविच्छेदन अहवालात चुकीच्या औषधोपचारामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही ठाणेदारांनी स्पष्ट केले आहे.
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.